🕒 1 min read
नवी-दिल्ली : आज २६ नोव्हेंबरला भारतात संविधान दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. आजच्याच दिवशी १९४९ मध्ये भारतीय संविधान समितीने भारतीय राज्यघटनेचा अवलंब केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Dr.Babasaheb Ambedkar) यांच्या अध्यक्षतेखाली २६ जानेवारी १९५० ला भारतीय संविधानाची अंबलबजावणी करण्यात आली. जवळपास २ वर्ष ११ महिने आणि १७ दिवस आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जगातील सर्वात मोठ्या संविधानावर काम करण्यात आले होते. दरम्यान, आज या भारतीय राज्यघटनेस ७१ वर्षे पूर्ण होत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,’आज आपल्याला संविधानाची निर्मिती करावी लागली असती तर काय झालं असतं? स्वातंत्र्याच्या आंदोलनाची छाया, देशभक्तीची आग, फाळणीचं दु:ख हे सर्व असूनही त्यावेळी देशहित सर्वोच्च हाच सर्वांच्या मनात मंत्रं होता. विविधतेने नटलेला देश, अनेक भाषा, पंथ आणि राजेरजवाडे हे सर्व असूनही संविधानाच्या माध्यमातून सर्व देशाला एका बंधनात बांधण्याची योजना बनवणे कठीण होतं. आजच्या संदर्भात त्याकडे पाहिलं तर संविधानाचं एक पानही आपण लिहू शकलो असतो का? असं सांगतानाच त्यावेळी राष्ट्र पहिलं होतं. परंतु काळानुसार राजकारणाचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे कधी कधी देशहितही मागे पडतं आहे,’असे मोदी म्हणाले.
Addressing the programme to mark Constitution Day in Central Hall. https://t.co/xmMbNn6zPV
— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2021
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’संविधान निर्मित्यांचेही स्वत:चे काही विचार असतील. त्यांचीही विचारधारा असेल. त्याला धारही असेल. पण तरीही त्यांनी राष्ट्रहित सर्वोच्च मानून संविधान लिहिलं ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. संविधान हे केवळ कलमांचं संग्रह नाहीये. तर हजारो वर्षांची महान परंपरा, अखंड धारा आणि त्याची आधुनिक अभिव्यक्ती म्हणजे संविधान आहे. आपला जो मार्ग आहे, तो योग्य आहे की नाही याचं दिशादिग्दर्शन संविधानाद्वारे केलं जात आहे. त्यामुळे संविधान मानलं पाहिजे,’ असेही मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- ‘अब की बार मोदी सरकार’ची आठवण करून देत शिवसेनेचा हल्लाबोल
- मागील सात वर्षांत झालेली इंधनाची जबर दरवाढ हेच महागाईच्या भरारीचे मुख्य कारण- संजय राऊत
- राजनाथ सिंह यांनी केला पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगींच्या ‘त्या’ फोटोचा खुलासा
- आज विज्ञानाचा आग्रह किंवा आस्था निर्माण करण्याची आत्यंतिक गरज- शरद पवार
- हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमांमध्ये मराठीमध्येच सूत्रसंचालन करण्यात यावं- भगतसिंह कोश्यारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
