Share

‘सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, हे रसायन शिवसेनेचं’, गुलाबराव पाटलांचा टोला

Published On: 

सोलापूर : शिवसेना नेते तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोलापूर येथील सांगोला येथे भाजपावर निशाना साधला आहे. ‘शिवसेनेमध्ये पुंगानी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले. शिवसेनेमध्ये रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले. पानटपरी चालवणारा हा गुलाबराव पाटील तुमच्यासमोर मंत्री म्हणून बोलतोय. हे सोडाच सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, हे रसायन शिवसेनेचं आहे.’ असे गुलाबराव पाटील म्हणाले.

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले, दोन वर्षापासून गणपती पाण्यात टाकून बसलेत, डोंबऱ्याचा खेळ सुरु आहे. मुलगी दोरीवर चालतेय. बाहेर एक पोट्टा उभा आहे. ही मुलगी कधी खाली पडेल आणि कधी मी लग्न करणार. पण चिंता करण्याची गरज नाही. हे सरकार पाच वर्ष शंभर टक्के चालणार आहे.

पुढे गुलाबराव पाटील म्हणाले, मला माहित आहे की, गाडी चालवायची असेल तर लायसन्स लागते. एसटी चालवायची असेल, तर लायसन्स लागते. पण, शरद पवार साहेबांनी विना लायसन्सचा ड्रायव्हर बसून दिला. उद्धव साहेब ड्रायव्हर, अजित पवार कंडक्टर आणि बाळासाहेब थोरात प्रवासी! माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटलं की, हा ड्रायव्हर अपघात करेल. दोन वर्षामध्ये वळणाचे रस्ते आले, टेकडी आली, पहाड आले; पण आमची तीन लोकांची गाडी सुस्साट पळत आहे’, असे म्हणत पाटील यांनी भाजपाला टोला लगावला.

भारतीय जनता पार्टीला आग होऊ लागली आहे. ५० हजारांचा भ्रष्टाचार असला, तरी ईडी. जसे पोलीस आहेत, तशी आता ईडी आहे. गुलाबराव पाटील जास्त बोलतो, लावा ईडी. आता चौफेर ईडी चालू झाली आहे. पोलिसांचा वापर. केंद्र सरकारचा वापर. उद्या म्हणतील जास्त बोलतोय याला जेलमध्ये टाका. आम्हाला जेल काय नवीन आहे का?’, असेही पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!