Share

औरंगाबादचे संभाजीनगर तर अहमदनगरचे नाव आंबिकानगर करा; शिवसेना खासदाराची मागणी

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर:- मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.

आता याच मुद्यावरून राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे.

दरम्यान, औरंगाबादप्रमाणेच अहमदनगरचेही नामांतर व्हावे. अहमदनगरचे नाव आंबिकानगर करावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी काल शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे.

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व्हावे, ही जनतेची इच्छा आहे. त्यासंबंधी आमचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. मात्र, औरंगाबादपाठोपाठ अहमदनगरचेही नामांतर होऊन या शहराला अंबिकानगर नाव देण्यात यावे अशी आमची मागणी आहे, असे सांगत खासदार सदाशिव लोखंडे यांनी या जुन्या मागणीला हवा भरली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!