Share

सैराट, फॅन्ड्री यांसारख्या हिट चित्रपटांनंतर नागराज मंजुळेंचा ‘घर बंदूक बिरयानी’ लवकरच….

Published On: 

मुंबई : सैराट आणि फॅन्ड्री सारखे हिट सिनेमी देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच आणखी एक सिनेमा चाहत्यांसाठी घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे शीर्षक घर बंदूक बिरयानी…असं असणार आहे. लागोपाठ मिळालेल्या यशानंतर नागराज मंजुळे यांच्या या  चित्रपटाची अनेकजण आतुरतेने वाट पाहता आहेत.

आपल्या आगळ्या वेगळ्या धाटणीचा विषय आणि तेवढ्याच ताकदीनं प्रभावीपणे पडद्यावर साकारणारा दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे याची ओळख आहे. त्याच्या फॅन्ड्री चित्रपटानं केवळ भारतीयच नाही तर जगभरातील काही नामवंतांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर आलेल्या सैराटनंही नागराजला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाल्याचे दिसुन आले.

दरम्यानच्या काळात त्यानं काही शॉर्ट फिल्म्सही केल्या. ज्या प्रेक्षकांना आवडल्या. मग तो बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड नावाच्या चित्रपटाच्या तयारीत होता. आगामी काळामध्ये त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या नागराज चर्चेत आला आहे त्याच्या नव्या चित्रपटाच्या टीझरमुळे त्या चित्रपटाचे नावच हटके आहे. ‘घर,बंदूक, बिर्याणीची’ अशा त्याच्या या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला अपेक्षेनुसार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

त्या टीझरमध्ये सांगण्यात आले आहे की, फँड्री, सैराट आणि नाळच्या यशानंतर झी स्टूडिओज आणि नागराज मंजुळे प्रस्तुत ‘घर,बंदूक, बिर्याणी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, त्यात प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे, आकाश ठोसर यांची भूमिका असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!