मुंबई : राज्यभरात लॉक डाऊन असताना शेतकरी सवर्तोपरी मदत करत आहेत. या संकटाच्या काळात तेही जीव धोक्यात घालून नागरिकांना शेतमाल पुरवत आहे. माझ्या या शेतकरी बांधवांचे मनापासून आभार मानले पाहिजे. याचशिवाय, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, करणारे कर्मचारी यांचे देखील आभार मानले पाहिजेत, तर पोलिसांचेही किती कौतुक करावे तेही कमी आहेत. असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संकटाच्या काळात या सर्व सुविधा पुरविणाऱ्या यंत्रणांचे आभार मानले. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी दिल्लीतील मरकज कार्यक्रमाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या मरकजच्या सदस्य डॉक्टरांशी असभ्य वर्तन करत आहेत. डॉक्टरांच्या अंगावर थुंकणे, नग्नावस्थेत फिरणे असले गैरप्रकार तेथे सुरु आहेत. मरकजच्या या मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे असं म्हटलं आहे. अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. मरकजमध्ये मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे असंही यावेळी ते म्हणाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले,’ निवडणुकीच्या कुणाला मतदान करावं सांगायला येणारे मुल्ला मौलवी आहेत कुठे ? या लोकांचा वेगळा विभाग उभा करून त्यांची वैद्यकीय उपचार बंद करायला हवे. लोकांच्या अंगावर थुकंतायत का, या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत. मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

