Share

श्रीरामपूरच्या लॉकडाऊनला माझा विरोध- भानुदास मुरकुटे

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. श्रीरामपुर तालुक्यातही कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणूनच प्रशासन, व्यापारी, विविध संघटना, आणि पत्रकार यांच्या संयुक्त बैठकीत संपूर्ण श्रीरामपुर शहर रविवार १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबर पर्यंत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या निर्णयानंतर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवत, व्यापाऱ्यांना दुकाने खुले ठेवण्याचे आवाहन केले आहे.

संपूर्ण देशात आणि राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. श्रीरामपूर बंद ठेवणारे हे कोण? श्रीरामपूर शहर बंद ठेवणे चुकीचे असून या बंदला आपला पूर्ण विरोध आहे. त्यामुळे ज्यांना दुकाने उघडी ठेवायची त्यांनी उघडी ठेवावीत. काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन माजी आमदार मुरकुटे यांनी व्यापाऱ्यांना केले आहे. तसेच काही तरुण व्यावसायिकांनीही आम्ही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे जाहीर केल्याने रविवारपासून पुकारलेल्या श्रीरामपूर लॉकडाउनच्या निर्णयात मतभेदाचा खडा पडला आहे.

यासंदर्भात मुरकुटे यांनी सांगितले, लॉकडाऊनमुळे आधीच हातावर पोट असणाऱ्यांचे खूप हाल झाले आहे. आता कुठे बाजारपेठ सुरळीत होत असताना पुन्हा लॉकडाउनचा निर्णय घेणे चुकीचे आहे. लॉकडाउन ठेवून काही उपयोग होणार नाही. जे नियम पाळणार नाही त्यांना बाधा होणारच तसेच ज्यांच्याकडे भरपूर आहे ते वर्षभर घरात बसतील परंतु सामान्य गोरगरिबांनी काय करायचं? अशा शब्दांत मुरकुटे यांनी श्रीरामपूर लॉकडाउनला तीव्र विरोध केला आहे.

महत्वाच्या बातम्या:-

असं असेल मुंबई ईंडीयंसच्या सामन्यांचं वेळापत्रक

‘गुड बाय नागपूर’ – तुकाराम मुंढे झाले भावुक; म्हणाले…

बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्विट करत  कंगनाचा पुन्हा शिवसेनेवर  निशाणा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!