🕒 1 min read
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशामधील लखीमपूर खीरी येथे रविवारी शेतकऱ्यांसह ९ जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडण्यात आले. दरम्यान, यासंदर्भात माहिती देत लखनऊचे पोलीस महानिरीक्षक लक्ष्मी सिंह पोलीस दल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचा मुलगा आशीष याच्या मागावर असल्याचे सांगितले. तसेच ‘इंडिया टुडे’ने या प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआर कॉपीनुसार केलेल्या वृत्तांकनानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करताना आशीष मिश्राने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला. तसेच शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या गाडीमध्ये आशीष होता असाही उल्लेख या एफआयआरमध्ये आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देत सिंह म्हणाले की,’दुपारी तीन वाजेच्या सुमारास आशीष मिश्री १५-२० जणांसोबत तीन गाड्यांमधून अगदी वेगाने बनबीरपूरमधील आंदोलनाच्या ठिकाणी आले. मोनू मिश्रा हा या महेंद्रा थार गाडीच्या पुढील भागी डाव्या बाजूस बसला होता. त्याने गोळीबार केला. गाडी वेगाने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमधून गेली,’ असा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. तसेच ‘सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेले व्हिडीओ आणि माहितीचाही तपासासाठी वापर केला जात आहे’ असेही सिंह म्हणाले.
दरम्यान, लखीमपूर खीरी हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली असून, या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण, न्या. सुर्यकांत आणि न्या. हिमा कोहली त्रिसदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी आज सकाळी सुरु झाली. या प्रकरणात आशीष याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असला तरी त्याला अजून अटक झालेली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा व ओबीसींबाबत दुटप्पीपणामुळे भाजपला फटका; पोटनिवडणुकीबाबत अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया
- धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी झाली खुली; ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन
- देवेंद्र फडणवीस तब्बल ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
- राज्यावर, देशावर असलेले हे कोरोनाचे संकट दूर होउदे; छगन भुजबळ यांची सप्तश्रृंगी मातेच्या चरणी प्रार्थना
- निवृत्त न्यायाधीश करणार लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास; दोन महिन्यांची डेडलाईन


