मुंबई : रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक फार्मा या कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व रात्री त्यांना अटक झाल्याचे समजताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
यावेळी पोलीस आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाल्याचे देखील समजत आहे. दरम्यान, कंपनीच्या संचालकांकडे जवळपास 60 हजार रेमडेसिवीरचा साठा असल्याच्या संशयावरून त्यांना चौकशीसाठी विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांनी चौकशी दरम्यान सर्व लीगल पेपर्स दाखवल्याने त्यांना अटक न करता चौकशी करून सोडून देण्यात आलं आहे.
याच पार्श्वभूमीवर आता राज्याच्या दोन्ही सभागृहाचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्याविरोधात विलेपार्ले पोलीस स्थानकात तक्रार, राष्ट्रवादीच्या लीगल सेलचे पदाधिकारी नितीन माने यांनी दिली तक्रार, सरकारी कामात व्यत्यय आणणे तसेच पोलीस अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली.
रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा आणि साठेबाजीवरून महाराष्ट्रात राजकारण तापलं असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. ‘भाजप नेत्याचे हे कृत्य मानवतेविरोधात,’ असल्याची घणाघाती टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. त्या म्हणाल्या, कि ‘देशातील कानाकोपऱ्यात लोक रेमडेसिवीर औषध मिळावे यासाठी वणवण फिरत आहेत. आपला जीव वाचावा म्हणून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावे यासाठी लोक सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत एका जबाबदार पदावर राहिलेले भाजपचे नेते रेमेडेसिवीर ओषधाची साठेबाजी करतात हे मानवतेविरोधात आहे.’ असे त्या म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- देवदूता प्रमाणे रेल्वे पॉईंटमनने वाचवला चिमुकल्याचा जीव, रेल्वेमंत्र्यांनी केले कौतूक
- कोरोना योद्ध्यांच्या मानधनात दुजाभाव; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार
- दिलासादायक : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी नेझेल स्प्रे ठरतोय ९९ टक्के प्रभावी
- …तर विरोधी नेत्यांना देखील रेमडेसिवीरच श्रेय घेता आलं असतं – संजय राऊत
- ‘निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत पोहचवण्याची युद्धपातळीवर कार्यवाही’


