🕒 1 min read
कोल्हापूर : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर भरकटलं असल्याच्या काही बातम्या माध्यमांमधून प्रसारित झाल्या होत्या. धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे दोघेही नेते सुखरुप आहेत.भगवंताची कृपा आणि जनतेच्या सदिच्छा आहेत,हेलिकॉप्टर भरकटलं नव्हतं, त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं मुंडे यांनी म्हटलं आहे.
कोल्हापुरात परिवर्तन सभा आयोजित करण्यात आली होती.वाऱ्याचा वेग उलट दिशेने असल्याने धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर भरकटलं. त्यामुळे कोल्हापूरऐवजी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर बीडमध्ये उतरवण्यात आलं. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे कोल्हापुरातील नेते हसन मुश्रीफ यांनी सभास्थळी दिली. यानंतर हे वृत्त प्रसारित करण्यात येवू लागलं होत.
दरम्यान, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे दोघेही नेते सुखरुप आहेत.हेलिकॉप्टर भरकटलं नव्हतं, त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं मुंडे यांनी म्हटलं आहे.
मी बीड येथील गहिनीनाथगडाचा कार्यक्रम संपवून कोल्हापूरच्या सभेसाठी जात आहे. हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी चूक असून काहीही झालेले नाही, आम्ही 10 मिनिटांत कोल्हापूरच्या विमानतळावर उतरू. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. माझ्यावर भगवंताची कृपा आणि जनतेच्या सदिच्छा आहेत. pic.twitter.com/3PQuA9xtnX
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 28, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
