Share

मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा, मात्र डिझास्टर कंट्रोलरूमची अद्याप जुळवाजुळवच सुरू- शेलार

Published On: 

मुंबई – 13 आणि 14 जूनला मुंबईत मुसळधार पाऊस होईल असा, अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असला तरी मुंबई महापालिकेचे वॉर्डमध्ये असणारे ‘कंट्रोल रूम’ एमएसआरडीसी आणि एमएमआरडीए यांचे कंट्रोल रूम अद्याप जुळवाजुळवी मध्येच आहेत. पुर्ण सज्ज नसल्याचे पहायला मिळते आहे. आज मुंबईतील या डिझास्टर कंट्रोलरूमची पाहणी भाजपा नेते माजी शिक्षण मंत्री आमदार आशिष शेलार यांनी केल्यानंतर असे चित्र समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई महापालिका एकीकडे कोविड रुग्णांच्या रुग्णसेवेत असली तरी या वर्षी मान्सून पूर्वतयारीच्या कामात दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे. भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी नुकतीच मुंबईतील नालेसफाईची पाहणी केल्यानंतर यावर्षी केवळ 40 टक्के नालेसफाई झाल्याचे, त्यांनी बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळा पूर्वी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाला भेट देऊन नियंत्रण कक्ष बेसावध असल्याचेही त्यांनी उघड केले होते. आता पाऊस मुंबईत कधी दाखल होईल यापूर्वीचा अनुभव पाहता ज्याप्रकारे यंत्रणा सुसज्ज ठेवावी लागते त्या पद्धतीने यावर्षी यंत्रणा सज्ज आहे का ?हे त्यांनी आज पाहिले असता, अद्यापी नियंत्रण कक्ष जुळवाजुळव करीत आहेत, सर्व यंत्रणा व कनेक्टिव्हिटी ने नियंत्रण कक्ष सज्ज नसल्याचे चित्र समोर आले आहे.

आज आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या वॉर्डमध्ये असणाऱ्या नियंत्रण कक्षासह, एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाची पाहणी केली. मुंबई महापालिकेचे नियंत्रण कक्ष सध्या कोरोना रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहेत, त्यामुळे मान्सूनच्या कामाबाबत अद्याप म्हणावी तशी तयारी दिसत नाही. याबाबत पालिका यंत्रणेचे दरवर्षी पेक्षा दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या दिसून येते आहे. ज्या एमएमआरडीएचे मुख्यमंत्री स्वतः अध्यक्ष आहेत, त्या एमएमआरडीएचा डिजास्टर मॅनेजमेंट रूम केवळ 200 फुटांचा असून एक संगणक, एक दूरध्वनी, या पलीकडे तिथे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. या कक्षात अधिकारी उपलब्ध नाही, असे चित्र सध्या पाहायला मिळते आहे. आपत्कालीन काळात आवश्यक असणारी व कार्यरत राहणारी तांत्रिक यंत्रणा कोणत्याही स्वरूपात उभी केली पाहायला मिळत नाही.

एमएसआरडीसीचा जीआर कालच निघाला असून त्यांच्या नियंत्रण कक्षात यंत्रणा तुलनात्मक बरी आहे, मात्र मुंबईतील रस्ते आणि उड्डाणपूल याबाबतची जबाबदारी असणाऱ्या एमएसआरडीएकडे पावसाळ्यामुळे खड्डे पडल्यास संबंधित अभियंत्याला कळल्यानंतर कोणत्या ठिकाणाहून कोल्डमिक्स अथवा हाँटमिक्स उपलब्ध केले जाणार त्यासाठीची वाहतूक यंत्रणा कशी असणार? याबाबत कोणतीही सुसज्जता एमएसआरडीसीच्या नियंत्रण कक्षात दिसून येत नाही. दरवर्षी मुंबईला पाऊस, पुराचा फटका, रस्त्यावर पडणारे खड्डे याचा आजवरचा अनुभव पाहता तिन्ही यंत्रणांचे आपत्कालीन कक्ष अद्याप परिपूर्ण सज्ज नाहीत, असे दिसून आल्याचे आमदार अँड आशिष शेलार यांचे म्हणणे आहे.

जाणून घ्या बदामाचे आरोग्यदायी फायदे

आता फक्त बोलून नाही तर करुन दाखवा : आशिष शेलार

धक्कादायक : प्रदूषण करणारे सर्वाधिक ५  हजार ३०६ उद्योग पुणे विभागात

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!