🕒 1 min read
मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझवर पार्टी करण्यासाठी अंमलीपदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा होत असल्याचे दिसत आहे. आर्यन खान याच्यासह दोन जणांना ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एनसीबीकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. मात्र आता याप्रकरणी मुंबई पोलीस देखील तपास करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
https://www.instagram.com/reel/CUkw1TllGF-/?utm_source=ig_web_copy_link
मुंबई पोलिसांकडून आता या प्रकरणातील आरोपी आणि आयोजकांसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोशल मिडीयावर कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत क्रूझवर प्रचंड गर्दी झाल्याचं दिसत आहे. या पार्टीचा कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट दिसत आहे. इतक्या मोठ्या पार्टीला परवानगी कोणी दिली ?, तक्या मोठ्या प्रमाणात लोक क्रूझवर आले कुठून? असे सवाल देखील यावेळी उपस्थित केला जात आहे. यासर्व गोष्टीची माहिती सध्या मुंबई पोलीस घेत आहेत.
आरोपी नियमित अमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांच्या मोबाइलवरील संदेशावरून स्पष्ट होत आहे. याशिवाय आर्यनच्या मोबाइलवरूनही महत्त्वपूर्ण संदेश सापडले आहेत, असा दावा एनसीबीने केला आहे. याप्रकरणी आणखी एका संशयिताला मुंबईतून अटक केली आहे. दरम्यान,हे क्रूझ जहाज मुंबईहून गोव्याकडे जात होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग्स तस्कर आहेत. प्रत्येक व्यक्तीने या पार्टीत प्रवेशासाठी ८० हजार रुपयांपेक्षा जास्त फी भरली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘निवृत्त नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींमार्फत लखीमपूर घटनेची चौकशी करा’
- ‘निवडणूक आचारसंहितेचे कारण न दाखवता मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा’
- ‘शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला, अन् जशास तसे उत्तर द्या’
- भाजपा हा पक्ष शिवसैनिकांसाठी मावशीसारखा आहे – सुभाष साबणे
- शासकीय सेवेतील पती-पत्नीवरील अन्याय दूर करा; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
