Share

#Coronavirus : सिद्धिविनायक मंदिराकडून भाविकांसाठी सॅनिटायझरची सोय

Published On: 

मुंबई : ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील अनेक देवस्थानांनी आपल्या यात्रा आणि कार्यक्रम रद्द केले आहे. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिर परिसरातही कोरोनाबाबत खबरदारी घेतली जाते आहे.

याच पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सॅनिटायझर दिले जाते. याच प्रमाणे कोरोना’चा प्राधुर्भाव वाढू नये म्हणून दर १५ मिनिटांनी मंदिरात स्वच्छता केली जाते,’ अशी माहिती बांदेकर यांनी दिली.

पुढे बोलताना बांदेकर म्हणाले,’ मंदिरात कार्यकर्त असणार्या कर्मचाऱ्यांना माक्स चे वाटप करण्यात आले आहे. कोरोना रोखण्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज आहे. काळजी घ्या… स्वच्छता राखा…,असे आवाहन सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे केले जात आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, कोरोना विषाणू’चा फटका कोल्हापुरातील ज्योतिबा मंदिराला पण बसला असल्याचे पाहायला मिळत आहे. दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिर अखेर बंद करण्यात आले आहे. ज्योतिबाचे दर्शन मध्यरात्रीपासून बंद केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय झाला असून, ज्योतिबाच्या चैत्र यात्रेवर देखील कोरोनाचे सावट आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या आजच्या घडीला ३१ वर गेली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!