🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव आता जवळ येऊन ठेपला आहे. १९ डिसेंबरला कोलकाता शहरात लिलाव पार पडणार आहे. पण, त्याआधी १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व संघांना त्यांचे खेळाडू मुक्त करण्याची तसेच खेळाडूंचे दुसऱ्या संघांशी ट्रेडिंग करण्याची मुदत होती.
त्यानुसार सर्व संघांनी त्यांच्या मुक्त केलेल्या खेळाडूंची तसेच संघात कायम केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. सर्व ८ संघांचे मिळून १२७ क्रिकेटपटूंना त्यांच्या संघांनी संघात कायम केले आहे. यामध्ये ३५ परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे.
दरम्यान तीन वेळा विजेतेपद मिळालेल्या मुंबई इंडियन्स संघानं काही खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. अष्टपैलू खेळाडू युवराजसिंग आणि मुंबईकर आक्रमक युवा फलंदाज सिध्देश लाडला रिलीज करण्याचा निर्णय मुंबईने घेतला आहे. सिध्देश लाड पुढच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार आहे.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा धवल कुलकर्णीला पुन्हा मुंबई संघात स्थान देण्यात आले. सुरुवातीच्या हंगामात धवल मुंबई इंडियन्सकडून खेळत होता.तसेच मुंबई इंडियन्सनं न्यूझीलंड संघाचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्टला आपल्या संघात सामिल केले आहे. गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या बोल्टला रिलीज केल्यानंतर मुंबईनं संघात घेतले. बोल्ट मुंबईच्या ताफ्यात सामील झाल्याने संघाला आणखी ताकत मिळाली आहे.
मुंबई इंडियन्सने मुक्त केलेले खेळाडू :
एव्हिन लुईस, अॅडम मिलने, जेसन बेहरेन्डॉर्फ, ब्युरन हेंड्रिक्स, बेन कटिंग, युवराज सिंग, मयंक मार्कंडे, बरिंदर स्रान, रसीख सलाम, पंकज जसवाल, सिद्धेश लाड, अलझरी जोसेफ.
कायम केलेले खेळाडू :
रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, किरॉन पोलार्ड, क्विंटन डी कॉक, मिशेल मॅक्लेनाघन, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, कृणाल पंड्या, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंग, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, ईशान किशन, अंकुल रॉय, धवल कुलकर्णी, आदित्य तारे, शेरफेन रुदरफोर्ड, जयंत यादव.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1196363721976631297?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1196363104340152321?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
