Share

आयपीएलचे वेळापत्रक जाहीर : मुंबई-चेन्नईमध्ये रंगणार सलामीची लढत

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी आता केवळ एका महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. आयपीएलच्या हंगामाची सुरुवात 29 मार्चपासून होणार आहे. त्यामुळं चाहत्यांमध्ये या हंगामाची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान आता या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. हंगामाचा पहिलाच सामना हायवोल्टेज असणार आहे, कारण हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडेवर होईल.

मार्च महिन्यात भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळेल. १८ मार्चरोजी कोलकात्यात तिसरा वन-डे सामना खेळवल्यानंतर बरोबर ११ दिवसांनी आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे.

तेराव्या हंगामात शनिवारी Double Header सामन्यांची संख्या कमी करण्यात आलेली असून, संपूर्ण हंगामात केवळ ५ Double Header सामने खेळवले जाणार असून ते रविवारी खेळवले जातील. १७ मे रोजी विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळणार आहे.

https://twitter.com/KKRiders/status/1228733597651066881?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!