🕒 1 min read
मुंबई : आयपीएलमध्ये जेव्हा मुंबई इंडियन्सचे नाव येते तेव्हा कायरान पोलार्डचे नावाचा उल्लेख झाल्याशिवाय राहुच शकत नाही. मुळचा वेस्ट इंडिजचा नागरिक असला तरी त्याला मुंबईकर पोलार्ड म्हणले जाते. पोलार्डने मुंबई इंडियन्ससाठी त्याच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याला नकार दिला होता. २०११ साली वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या एका करारावर त्याने सही करायला नकार दिल्यामुळे त्याला राष्ट्रीय संघातील स्थान गमवावे लागले होते. त्याचे चाहते त्याला लाडाने ‘पॉली’ म्हणतात
२०१० च्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने ३.३ कोटी रुपयांची किंमत मोजुन खरेदी केले होते. त्याकाळात हा आयपीएलमधील मोठा करार होता. २०१० मध्ये पोलार्डने चॅम्पियन्स टी२० लीगमध्ये न्यू साउथ वेल्स संघाविरुद्ध टोबॅगो संघाकडून खेळताना १८ चेंडूत ५४ धावा केल्या होत्या. तेव्हा पासुन पोलार्ड हा कायम मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. नुकत्याच स्थगित झालेल्या आयपीएल स्पर्धेत पोलार्डने सलग पाच सामने जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा एकहाती पराभव केला. चेन्नईने उभा केलेल्या २०० धावांचा डोंगर पोलार्डने एकहाती पार केला.
Everyone needs a Superhero. We call ours – ???????????? ???????????????????? ????♂️
To the Big Man who has rescued us from impossible situations & delivered unbelievable moments time & again, a very happy birthday ???????????????????????????? ????????#MumbaiIndians #OneFamily #HappyBirthdayPollard @KieronPollard55 pic.twitter.com/DFjFwxP3Uu
— Mumbai Indians (@mipaltan) May 11, 2021
याप्रमाणे अनेक सामन्यात पोलार्डने मुंबई इंडियन्सला सामने जिंकुन दिले आहेत. आयपीएलमध्ये चेन्नई विरुद्ध पोलार्डची बॅट जास्त तळपते. मुंबई-चेन्नई संघादरम्यान झालेल्या लढतीत पोलार्डने सर्वाधिक सामनाविराचे पुरस्कार पटकावले आहे. आयपीएलमध्ये पोलार्डने आतापर्यंत १७१ सामने खेळत ३१९१ धावा केल्या आहेत. याबरोबरच पोलार्ड हा जगात सर्वाधिक टी-२० सामने खेळणारा खेळाडू आहे. पोलार्डने तब्बल ५४१ टी-२० सामने खेळला आहे. यात त्याने ७२६ षटकारांच्या मदतीने १०७९७ धावा केल्या आहेत. पोलार्डने आतापर्यंत त्याच्या टी-२० कारकिर्दीत तब्बल ३० संघाकडुन अधिकृत टी-२० सामने खेळला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुण्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र असले, तरी आपण आता गाफील राहणार नाही’
- पदोन्नतीतील मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक घेऊन रणनिती ठरवा : कॉंग्रेस
- ‘गंगेच्या किनारी विखुरलेल्या अवस्थेत पडलेले मृतदेह पाहून मनाला खूप वेदना झाल्या…!’
- ‘या’ भारतीय खेळाडूंसाठी कसोटी संघाची वाट झाली आहे खडतर
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

