आग्रा: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्र्यातील मुघल संग्रहालयाचे नामकरण करून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असे केले आहे. जेव्हा पासून योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यापासून ते वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणांचे नावं बदलत आहे. मुघलांची ओळख आम्हाला नकोय आणि आम्हाला आमच्या संस्कृतीवर गौरव आहे, असं योगींनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांंचा अपमान करून त्यांना कैद केले होते त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीने ‘आग्र्याहून सुटका’ करून घेतली होती.आता या नामकरणामुळे महाराष्ट्रात आनंद व्यक्त केला जात आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या संस्कृतीच्या उत्थानासाठी अनेक पाऊले उचलली आहेत. बहुमताने भाजप सरकार आल्यानंतर त्यांनी राज्यात मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या अशा कारभारावर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव,माजी मुख्यमंत्री मायावती यांनी नेहमीच विरोध केला आहे. त्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री योगींनी अनेक स्थानांचे नामकरण केले आहेत.
आगरा में निर्माणाधीन म्यूजियम को छत्रपति शिवाजी महाराज के नाम से जाना जाएगा।
आपके नए उत्तर प्रदेश में गुलामी की मानसिकता के प्रतीक चिन्हों का कोई स्थान नहीं।
हम सबके नायक शिवाजी महाराज हैं।
जय हिन्द, जय भारत।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) September 14, 2020
दरम्यान याआधी त्यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण ‘अयोध्या’ असं केलं होतं. मुघलसराय जंक्शनचे नामकरण ‘पंडित दिनदयाल उपाध्याय जंक्शन’ तर अलाहाबाद शहारचं नाव ‘प्रयागराज’ असं केलेलं आहे. आता अलिगढ जिल्ह्याचे नावसुद्धा बदलावं अशी मागणी होत आहेत. आता त्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- मुंडे साहेबांचा अचानक मृत्यू झाला तेव्हा भाजपाला सीबीआय चौकशी करावी असे का वाटले नाही ?
- नोव्हेंबर अखेरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार : तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती


