🕒 1 min read
मुंबई : गेले ५ महिने कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाला प्रातिबंध म्हणून ३१ मे पर्यंत देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. यानंतर, जूनपासुन देशात अनलॉकची घोषणा केल्यानंतर टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ‘पुनःश्च हरिओम’ म्हणत ‘मिशन बिगीन अगेन’ ची घोषणा केली होती.
राज्यातील वाढती रुग्णसंख्या बघता लॉकडाऊन पूर्णतः हटवण्यास उद्धव ठाकरे यांनी नकार दिला होता. त्यानंतर आता हळूहळू जनजीवन हे सुरळीत होताना दिसत आहे. राज्यात लाखो नागरिक हे दैनंदिन कामांसाठी तसेच अडचणीच्या काळात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करत असतात. मात्र, २२ मार्च पासून राज्यातील सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली होती.
अंधश्रद्धांचं समाजातून समूळ उच्चाटन करणं हीच दाभोळकरांना खरी श्रद्धांजली – अजित पवार
आता, जनजीवन पूर्वपदावर येत असताना अनेक सामान्य लोकांना प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. आर्थिक फटका सहन करत खाजगी वाहनांची सोय करून ई-पासचे बंधन देखील पाळावे लागत होते. सरकारने आता चांगली खुशखबर दिली असून वाढती मागणी पाहता जिल्हाबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, एसटी वाहतूक देखील खुली होणार असून खाजगी वाहनाने प्रवास करताना मात्र ई-पास लागू होणार आहे. अत्यावश्यक सेवांसाठी आज हि सुरु असलेल्या एसटीने आता सर्वसामान्य नागरिकांना देखील प्रवास करता येणार आहे.
एका व्यक्तीला वाचवण्यासाठी अजून किती नागडे होणार; निलेश राणे संतापले
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.” ‘मिशन बिगिन अगेन’च्या माध्यमातून राज्यातील एसटी बसने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. फक्त एसटी बसच्या माध्यमातून प्रवासाला परवानगी देण्यात येणार. एसटी बसच्या प्रवासास विशेष परवानगी/ इ-पासची आवश्यकता नाही.” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई महापालिका आयुक्त म्हणतात …तर सीबीआयला परवानगी घ्यावी लागेल
पुनश्च:हरिओम….
एसटीची आंतरजिल्हा बस सेवा 20 ऑगस्ट 2020 पासून सुरू होत आहे. यामध्ये साधी,निमआराम, शिवशाही, शिवनेरी या बस सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होतील. एसटी प्रवासाला ई-पास ची गरज नाही.— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) August 19, 2020
एसटी महामंडळाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून देखील ट्विट करत माहिती दिली आहे, “पुनश्च:हरिओम….एसटीची आंतरजिल्हा बस सेवा 20 ऑगस्ट 2020 पासून सुरू होत आहे. यामध्ये साधी,निमआराम, शिवशाही, शिवनेरी या बस सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होतील. एसटी प्रवासाला ई-पास ची गरज नाही.”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
