Share

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महावितरणनं चांगले काम केले आहे- शेलार

Published On: 

पुणे – पुणे पदवीधर मतदार संघातुन भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ भाजपचे प्रवक्ते ,माजी मंत्री आशिष शेलार पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. पब, बार उघडण्यापूर्वी मंदिरं उघडण्याची मागणी चुकीची नाही. नियम घालून ते जर उघडलं जाऊ शकतं. तर मंदिरं नियम घालून का उघडली गेली नाहीत

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महावितरणनं चांगल काम केले आहे. वाढलेली थकबाकी ही शेतकऱ्यांना दिलेल्या थकबाकीची मुदत दिल्याने वाढली आहे. शेतकऱ्यांची काळजी या सरकारला नसेल तर गाठ आमच्याशी आहे. असा इशारा शेलार यांनी राज्य सरकारला दिलाय.

दरम्यान, परवा शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. “संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळागणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं,” असं शेलार यांनी सांगितलं होत.

त्यानंतर आज मात्र आपल्या विधानावरून ‘यु टर्न’ घेतला आहे. ‘देवेंद्र फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्री म्हणून उमेदवार राहतील,’ ‘ते’ विधान फक्त कार्यक्रमापूरते मर्यादित होते, असे स्पष्टीकरण शेलार यांनी दिले आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेलार यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!