🕒 1 min read
मुंबई : भाजपमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची स्थिती म्हणजे ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. राज्य कार्यकारणीतही नारायण राणे यांना स्थान न देवून भाजपनं त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यांचे काम केवळ बोल घेवडेपणाचे आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना नारायण राणे यांच्यावर पलटवार केला आहे.
नारायण राणे यांची सध्याची स्थिती म्हणजे ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली असून’कावीळ झालेल्यांना जसं पिवळं दिसतं, तसं शिवसेनेबद्दल द्वेष, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मत्सर या भावनेने नारायण राणे यांना पछाडलेलं आहे, असंही खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राणे यांच्या निशाण्यावर नेहमीच शिवसेना असते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरत असल्याचा मुद्धा अत्यंत आक्रमकपणे पुराव्यांसहीत नारायण राणे आणि त्यांची दोन्ही मुले आणत आहेत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून असल्याने त्यांचे प्रशासनावर नियंत्रण राहिलेले नाही. परिणामी राज्यातील कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे असा आरोप नारायण राणे यांनी केला होता.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खा. राणे म्हणाले की, कोरोनाची स्थिती हाताळताना कोणाचाच पायपोस कोणाला नाही, अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडतच नसल्याने त्यांना राज्यातील नेमकी स्थिती काय आहे, हे कळतच नाहीये. प्रशासनावर राज्यकर्त्यांचा वचक राहिलेला नसल्याने स्थिती भयानक बनली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत, सर्वाधिक मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात आहे. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. मात्र या राज्यातील रुग्णांची संख्या महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. मुख्यमंत्री घरात बसले आहेत, मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यभर हिंडून परिस्थितीची पाहणी करत आहेत. आरोग्य सेवकांना, पोलिसांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत, रुग्णांच्या समस्या जाणून घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
देव करो, देवेंद्र फडणवीस यांना कोरोना होऊ नये – गुलाबराव पाटील
‘कोरोना’शी लढताना विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या – अजित पवार
‘सत्तेत असो वा विरोधी बाकांवर, हा विषाणू भेदभाव करत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
