Share

खासदार सुप्रिया सुळेंनी मानले गडकरींचे आभार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे. गडकरी यांनी सासवड-राजुरी-सुपा रोड या मार्गाच्या नुतनीकरणासाठी ४.९१ कोटी रुपयांच्या कामाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे पुणे आणि बारामती मधील नागरिकांना त्याचा फायदा होईल.

या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी या रस्त्याच्या कामासाठी पैसे मंजूर करत असल्याचे सांगितले आहे. तसेच त्याला ‘प्रगती का हायवे’ असे देखील गडकरी यांनी संबोधले आहे. यावर प्रतिक्रीया देतांना खासदार सुळे यांनी गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहे.

बारामती आणि पुणे मार्गावर मोठ्या प्रमाणात व्यापार होत असतो. त्यात बारामती मतदार संघात पवार घराण्याचे वर्चस्व राहीले आहे. सध्या सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत. त्या आधी शरद पवार हे बारामती लोकसभा मतदार संघातील खासदार होते. इथल्या नागरिकांसाठी हा मार्ग महत्त्वाचा मानला जातो.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!