Share

इंदुरीकर महाराज वादात राजू शेट्टींची उडी,म्हणाले….

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ह.भ.प. इंदुरीकर महाराज हे माध्यमांच्या रडारवर असल्याचे चित्र आहे.कीर्तनच्या माध्यमातून अनेक विषयांवर परखड मत व्यक्त करणारे महाराज मुला-मुलींच्या जन्माबाबत केलेल्या विधानावरून वादात साडपले आहेत.

यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत असून, आता या वादात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उडी घेतली आहे. लिंग भेदाबाबत इंदुरीकर महाराजांच वक्तव्य चुकीचेच असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.स्त्री-पुरुष हा भेदभाव करणे चुकीचे आहे. महिलांचा सन्मान करायला सगळ्यांनी शिकलं पाहिजे. आधीच आपल्याकडे स्त्री लिंगाच गर्भपात करण्याचे प्रमाण वाढले आहे, आणि अशा परिस्थितीत पुन्हा अशा प्रवृत्तीला चालना मिळेल किंवा प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारचं वक्तव्य इंदुरीकर महाराजांसारख्या व्यक्तीने टाळले पाहिजे, असे शेट्टी म्हणाले.

दरम्यान, इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यामुळे भाजप आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी जुंपली आहे. वारकरी सांप्रदाय संपवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा डाव आहे. त्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादीवाले इंदुरीकर महाराजांवर टीका करत आहेत, असा आरोप करत भाजपने केला आहे. इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ भाजप मैदानात उतरलं आहे.

धार्मिक ग्रंथ आणि गुरूचरित्राच्या आधारेच इंदुरीकर महाराज बोलत आहेत, असा दावा भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे. इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनात जे दाखले देत आहेत ते ग्रंथांच्या आधारेच देत आहेत, असं कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!