Share

शिवसेना खासदाराच्या पत्नीला 1 वर्षाच्या कैदेची शिक्षा

Published On: 

मुंबई : २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षावेळी पोलिस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाल्याच्या प्रकरणात शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी यांच्यासह अन्य १७ जणांना सत्र न्यायालयाने मंगळवारी एक वर्षाच्या कैदेची शिक्षा सुनावली.

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत तुर्भे इथं शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांत पैसे वाटपावरून राडा झाला होता. यावेळी मध्ये पडलेल्या पोलिस कॉन्स्टेबल विकास थोरबोले हे ड्युटीवर तैनात पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.

या प्रकरणात कामिनी शेवाळे यांच्यासह १७ जणांविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात कामिनी यांच्यासह अन्य १७ जणांवर आयपीसी कलम १४९ आणि ४२७ या कलमांखाली मारहाण, हत्येचा प्रयत्न आणि जमावबंदीचा गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी आरोपींना जामीन मंजूर केला आहे. तसेच मुंबई सत्र न्यायालयातील न्यायाधीश डी के गुदाधे यांनी मंगळवारी हत्येचा प्रयत्न या आरोपातून सर्व आरोपींची सुटका केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!