Share

खासदार बापट यांच्यासह लोकप्रतिनिधींनी घेतली विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Published On: 

🕒 1 min read

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट व लोकप्रतिनिधींनी आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेवून पुण्यातील परिस्थितीबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केली. यावेळी आमदार दिलीप मोहिते, माजी खासदार प्रदीप रावत, पेट्रोल- डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष समीर लडकत, उपाध्यक्ष सागर रुकारी, राजेश पांडे आदी उपस्थित होते.

लॉकडाऊनमुळे परराज्यातील मजूरांना त्यांच्या गावी जाता येत नाही. परराज्याबरोबरच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातीलही मजूर अडकून पडले आहेत. त्यांना विना सायास कसे पाठवता येईल, याबाबत त्यांनी चर्चा केली. तसेच पेट्रोल, डिझेल मिळण्याबरोबरच कामगार, मजूरांना वैद्यकीय प्रमाणपत्र सहज कसे मिळवता येईल, याबाबतही चर्चा केली.

यावर विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी कोणत्याही डॉक्टरांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल, असे सांगितले. पेट्रोल पंप व किराणा दुकानांबाहेरही गर्दी होता कामा नये, तसेच बाहेरील राज्यात जाणाऱ्या कामगारांच्या अनुषंगाने तेथील जिल्हाधिकारी व पुणे जिल्हाधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. अत्यावश्यक साधन सामुग्री खरेदी करताना दुकाने तसेच पेट्रोल पंपाबाहेरही नागरिकांनी गर्दी करु नये. ज्या राज्यात व जिल्ह्यात कामगार परतणार आहेत, त्या ठिकाणच्या प्रशासनाशी जिल्हा प्रशासन संपर्क करत असून त्यांची परवानगी मिळाल्यानंतर याठीकाणाहून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात येत आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाचा निर्णय झाल्यास रेल्वेची व्यवस्था देखील केली जावू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार दिलीप मोहिते यांनीही या अनुषंगाने विविध मुद्यांवर चर्चा केली. विविध कंपन्या व उद्योगांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कामगारांना कंपनीमध्ये पोहोचण्याच्या मार्गावर पोलीसांनी अडवू नये, अशी सूचना प्रदीप रावत यांनी केली. यावेळी समीर लडकत, सागर रुकारी, राजेश पांडे यांनीही चर्चा केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!