Share

पदमश्री’ जाहीर झाल्यानंतर राहीबाईंची ‘ठसकेबाज’ प्रतिक्रिया

Published On: 

नगर – नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार गावाला आदर्श करून जागतिक पातळीवर नेणाऱ्या पोपटराव पवार व देशी बियाणांचं जतन करून बियाणांची बॅंक स्थापन करणाऱ्या अकोल्याच्या मदर ऑफ सीड अर्थात बीजमाता राहिबाई पोपेरे यांना केंद्र सरकारच्या वतीने पदमश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.एकाच वेळी दोघांना हा सन्मान मिळण्याची नगर जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे.

संकरित बियाणांचा प्रचंड वापर वाढलेला असताना राहीबाई पोपरे यांनी देशी आणि पारंपरिक बियाणांचं संकलन करत बियाणांची बँक तयार केली. लहानपणापासूनच बियाणे गोळा करण्याचा छंद जडलेल्या राहीबाई पोपेरे यांनी देशी वाणांच्या बियाणांच पारंपरिक पद्धतीनं सवर्धनं केलं. आज राहीबाई यांच्या सीड्स बँकमध्ये तब्बल ५४ पिकांचे ११६ जातींचे वाण आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक बियाणाविषयीची माहिती राहीबाईंना तोंडपाठ आहे. त्यांच्या या कार्याची बीबीसीनंही दखल घेतली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या हिवरे बाजार या गावाचा कायापालट करण्यात पोपटराव पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी गावात केलेल्या कामावरून महाराराष्ट्र सरकारनं आदर्श ग्राम योजना सुरू केली. यामुळे राज्यातील अनेक गावांचा चेहरामोहराच बदलून गेला.

अहमदनगर जिल्ह्यात कोंभाळणे हे एक आदिवासी खेडेगाव. या खेडेगावात आदिवासी शेतकरी आहेत. राहिबाई मुळच्या याच गावच्या. राहिबाईंच्या वडिलांकडून त्यांना खूप ज्ञान मिळाले, असे त्या सांगतात. वडिल नेहमी म्हणायचे, ‘जुनं ते सोनं’ त्याचा अर्थ राहिबाईंनी खूप चांगला समजून घेतला. राहिबाईंच्या आजुबाजुच्या परिसरातील आजही ५० टक्के शेतकरी हा पारंपरिक पद्धतीची देशी वाणाचे बियाणे वापरूनच शेती करतो.राईबाईंच्या ‘देशी बियाण्यांच्या बॅंकेत’ आज ५२ पिकांची ११४ वाण आहेत.

राहिबाई पोपेरे यांची यानंतर प्रतिक्रिया आली असून मला जो पुरस्कार जाहीर झाला आहे, तो मी आता पर्यंत केलेल्या काळ्या आईच्या सेवेचा आहे. बायफ संस्थेमुळे मला माझे काम सर्वांपर्यंत पोहचवता आले. या पुरस्काराने मला व माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला आहे. मी सर्वांची आभारी आहे. मी शाळा शिकले नाही परंतु निसर्गाच्या शाळेने मला खूप काही शिकवले आणि निर्सगाचे नीतिमूल्ये जपत यापुढेही कार्य करत राहीन असं त्यांनी म्हटलं आहे.

पारंपारिक आणि देशी वाणाचं जतन करणाऱ्या राहिबाई पोपेरे या ‘देशी बियाण्यांची बँक’ चालवतात. शैक्षणिकदृष्ट्या निरक्षर असलेल्या राहिबाई खरंतर ज्ञानाने समृद्ध आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात राहिबाईंचा उल्लेख ‘मदर ऑफ सीड’असा केला होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!