Share

मुंबईत तब्बल ‘इतक्या’ लोकांच्या तपासण्या झाल्या आहेत!

Published On: 

मुंबई – आज महाराष्ट्र दिन व कोरोना रोगाच्या संबंधित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यात त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या जुन्या आठवणी सांगितल्या. तसेच टाळेबंदी संबंधित राज्य सरकारची पुढील भूमिका देखील स्पष्ट केली.

दरम्यान, आजही ७५ ते ८० टक्के रुग्णांमध्ये कोरानाची सौम्य, अतिसौम्य लक्षणे आहेत किंवा लक्षणेच दिसत नाहीत. असे असले तरी आपण या सर्वांना विलगीकरण कक्षात दाखल करत आहोत. मुंबई महापालिका  ऑक्सीमीटरच्या सहाय्याने घरोघरी जाऊन तपासण्या करत आहे. आतापर्यंत २ लाखाहून अधिक तपासण्या झाल्या, ज्यात २७२ लोकांमध्ये ऑक्सीजनची कमी आणि इतर विकार असलेले रुग्ण सापडले.

महापालिका आता त्यांच्यावर उपचार करत आहे. कोरोनासंदर्भात जे जे काही नवीन चांगलं घडत आहे ते करण्यास महाराष्ट्र कुठेही कमी पडत नाही अशी ग्वाही ही त्यांनी दिली.

तर, परराज्यातील लोकांना त्यांच्या स्वगृही पाठवण्याची शिस्तबद्ध योजना शासनाने केली असून इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनाही महाराष्ट्रात परत आणले जाईल, परंतु त्यासाठी गर्दी व झुंबड न करता सहकार्य करण्याचे आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!