Share

‘पुढील एक-दोन आठवड्यात ‘कोरोना’चे अधिक रुग्ण मुंबईत पहावयास मिळतील’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 17 हजार 974 वर पोहोचली आहे. काल दिवसभरात 1 हजार 216 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच राज्य शासनाने कोरोनाच्या लढाईसाठी नियुक्‍त केलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे.

याबाबत बोलताना डॉ. संजय ओक म्हणाले, ‘कोव्हिडने संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच ढवळून काढली आहे. आजवरचे हे सर्वांत बिकट आव्हान आहे.पुढील एक-दोन आठवड्यात कोरोनाचे अधिक रुग्ण मुंबईत पहावयास मिळतील, अशी भीती ओक यांनी येथे व्यक्त केली.

याबाबत त्यांनी प्रथमच त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘ऋतु बदलल्यावरती या आजाराची दाहकता बदलेल का याचा आराखडा आताच बांधणे कठिण असले तरी पुढील काही महिन्यात कोरोना प्लस मलेरिया, कोरोना प्लस डेंगू अशा आजारांची शक्यता नाकारता येत नाही. पुढचे दोन-तीन महिने आरोग्य विभागासाठी आव्हानात्मक असतील’.

दरम्यान, काल राज्यात 43 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळीची एकूण संख्या 694 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मधील 24, पुण्यातील 7, वसई-विरारमधील 5, सोलापूर शहरात 2, अकोला शहरात 1, पालघरमध्ये 1 आणि औरंगाबाद शहरात 1 मृत्यू झाला आहे. याशिवाय मणिपूरमधील 1 आणि बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!