मुंबई : कोरोना बाधित रुग्णांची संख्या राज्यात 9318 वर पोहोचली आहे. आज एका दिवसात कोरोना बाधितांचा आकडा 729 ने वाढला आहे. तर दिवसभरात 31 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईची रुग्ण संख्या सहा हजारावर गेली असून पुण्यात देखील कोरोनाबाधितांचा आकडा हजारावर गेला आहे.
तसेच दिवसेंदिवस दिवस कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. तसेच कोरोना रोखण्यासाठी तब्बल १ महिना होऊन गेला देशात लॉकडाऊन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर जेष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी आपलं मत मांडलं आहे.
याबाबतचे वृत्त प्रभातने दिलं आहे. याबाबत बोलताना अभिनेते आगाशे म्हणतात, ‘सद्यस्थितीत कोरोनाला कसं हरवायचं नि मनुष्याच्या शरीरातून या विषाणूला कसं नष्ट करायचं यामागे मनुष्यजात लागली आहे,’ असं मत त्यांनी मांडले आहे.
दरम्यान, ‘आपण सतत निसर्गाच्या विरोधात जात आहोत. आपण त्याचाच एक भाग आहोत हे विसरलो आहोत. त्यामुळे ही लढाई कोरोनाविरुद्धची नव्हे तर निसर्गविरोधातील आहे,’ असं अभिनेते मोहन आगाशे म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
