Share

मोदी पावले! पथविक्रेत्यांच्या कुटुंबाचे सर्वेक्षण होऊन मिळणार मदत

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरातील पथविक्रेत्यांच्या कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात राज्यातील चार शहरांची निवड केली आहे. त्यात औरंगाबादसह नागपूर, नाशिक, सांगली-मिरज-कुपवाड या पालिकांचा समावेश आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात आर्थिक संकटात सापडलेल्या पथविक्रेत्यांना विविध योजनांचा लाभ देऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत विविध लाभ देखील देण्याचे धोरण आता राज्य सरकारने आखले आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या पथविक्रेत्यांना नव्याने व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी केंद्र सरकारने दहा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची योजना आणली आहे. यासंबंधीची प्रक्रिया केली जात असतानाच आता पथविक्रेत्यांच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी त्यांच्या कुटुंबांचेही सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्राच्या ‘स्वनिधी से समृद्धी’ या योजनेत पथविक्रेत्यांचा समावेश केला असून त्यामुळे केंद्राच्या आठ योजनांसह राज्य सरकारच्या विविध योजनांचाही लाभ पथविक्रेत्यांना होणार आहे. यासाठी प्रारंभी केंद्र सरकारने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ही योजना सुरू केली.

या योजनेसाठी इच्छुक पथविक्रेत्यांना बँकेमार्फत दहा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येत आहे. आता त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पथविक्रेत्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सरकारच्या विविध योजनांचा त्यांना लाभ मिळवून देण्याचे धोरण आखले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात राज्यातील औरंगाबादसह नागपुर, नाशिक, सांगली-मिरज-कुपवाड यांचा समावेश आहे.

कुटुंब सर्वेक्षणात या बाबी तपासणार
पथविक्रेत्यांच्या संपूर्ण कुटुंबांची राहण्याची जागा, दिव्यांचा दर्जा आहे का?, पथविक्रेत्यांच्या कुटुंबाचे सर्वेक्षण शिक्षण, कौशल्य, बँकिंग, स्थलांतरण, व्यवसाय, महत्वकांशा काय आहे आदी मुद्द्यांवर सर्वेक्षण करण्याची सूचना केली आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ती माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्याचेही सूचित केले आहे, असे उपसचिव शंकर जाधव यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!