🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन घोषित करण्यात आलं आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या जरी यामुळे नियंत्रित ठेवण्यास यश येत असल्याचं दिसत असल तरी याचे देशभरातील नागरिकांच्या आर्थिक गणितांवर विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे.
आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना याच मुद्द्यावरून ट्विटरवरून घेरण्याचा प्रयत्न केला आहे. सिंग यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एका महिलेचा व्हिडिओ शेअर केला आहे. याच व्हीडिओचा संदर्भ घेत दिग्विजय सिंह यांनी नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका करत सवाल उपस्थित केला आहे.
व्हिडिओमध्ये ही महिला कोरोना विषाणूविरूद्ध लढण्याच्या सरकारच्या भूमिकांवर अनेक प्रश्न उपस्थित करताना दिसत आहे. केंद्र सरकारने कोरोनाशी लढा देण्याची सर्व जबाबदारी पूर्णपणे सामान्य जनतेच्या खांद्यावर दिली असून, घरामध्ये जनतेलाच बंदिस्त राहावे लागते, जनतेलाच मास्क आणि सॅनिटायझर्स खरेदी करावे लागतात, घरातील नोकरांना काढून न टाकण्याची जबाबदारीही जनतेवरच आहे, लोकांना पगार देण्याची जबाबदारीही जनतेवरच, पंतप्रधानांच्या फंडातही जनतेनेचे मदत द्यायची आहे. मग असे असताना सरकार काय करत आहे?, असा सवाल तिने केला आहे.
ही सगळी जबाबदारी जनतेवर टाकलेली असताना सरकारने मात्र बँकांचे EMI माफ करण्याची सवलत जनतेला दिलेली नाही, असंही या महिलेने व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.
https://twitter.com/digvijaya_28/status/1257528656336957440
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
