मुंबई : जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या आयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बनविण्यात येणार आहे. या अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. यासाठी जवळपास ३०० जणांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचं राम जन्मभूमि ट्रस्टकडून सांगण्यात आलं आहे.
सकाळी ११.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल होणार आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी राम जन्मभूमीवर उपस्थित होणार आहेत. इथे ते नागरिकांनाही संबोधित करणार आहेत. अयोध्येत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी साकेत विद्यापीठातून रामजन्मभूमीकडे रवाना होतील. यावेळी पंतप्रधान मोदी हनुमानगढीलाही भेट देतील. भूमिपूजन कार्यक्रमात जवळपास २०० पाहुणे सहभागी होतील, असं सांगण्यात येतंय.
दरम्यान, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी यावरून पंतप्रधानांवर टीका केली आहे. “पंतप्रधानांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमला जाणं हे संविधानाच्या शपथेविरोधातील आहे,” असं मत ओवेसी यांनी व्यक्त केलं.
“पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे संविधानाच्या शपथेच्या विरोधातील आहे. धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा महत्त्वाचा भाग आहे. अयोध्येत ४०० वर्षांपर्यंत बाबरी मशीद उभी होती. परंतु काही गुन्हेगारांच्या गटानं १९९२ मध्ये ती पाडली हे आम्ही विसरणार नाही,” असं ओवेसी म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून याप्रकरणी टीका केली.
ओवेसी यांचा जळफळाट सुरु असताना आता अखिल भारतीय आखाडा परिषदेने औवेसींवर पलटवार केला आहे. नरेंद्र मोदी पहिल्यांदा हिंदू आहेत, त्यानंतर देशाचे पंतप्रधान आहेत असं महंत नरेंद्र गिरी यांनी सांगितले आहे.
नरेंद्र गिरी म्हणाले की, औवेसी यांना सनातन धर्माच्या आस्थेवर प्रश्न उपस्थित करण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांना भारतात होणारं कोणतंही काम चांगले वाटत नाही. प्रत्येक बाबतीत राजकारण करत राहतात. औवेसी यांनी ५ ऑगस्टला टीव्हीवर भूमीपूजनाचा कार्यक्रम लाईव्ह पाहावा आणि संपूर्ण वेळ राम नामाचा जप करावा, अल्लाह नामासोबत रामराम बोलायला हवं असा टोलाही महंतांनी दिला आहे.
‘… म्हणून लोकांना आजही मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत असंच वाटतं’
धक्कादायक : गर्भात असतानाच बाळाला कोरोनोचा संसर्ग;ससून रुग्णालयात घडली दुर्मिळ घटना
नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्राची मंजुरी; आरटीई कायदा आता १२वी पर्यंत लागू होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
