नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांच्या हातचा रोजगार गेला आहे. त्यामुळे परराज्यातील मजूर परत आपल्या घरी जाण्याची मागणी करत आहेत. तर अनेक मजुरांनी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र पायी चालत गावी जाण मजुरांच्या जीवावर बेतले आहे. अनेक मजुरांचा यामुळे मृत्यू झाला आहे.
मजुरांची ही अवस्था पाहून केंद्र सरकारने राज्य सरकारांना आदेश पाठवले आहेत. यामध्ये कुठल्याही परप्रांतीय मजुराला चालत घरी जाऊ देऊ नका. तसेच रेल्वेमार्फत सर्व परप्रांतीयांना त्यांच्या घरी पाठवले जाईल, तोपर्यंत तात्पुरत्या निवाऱ्यात सोय करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिले आहेत. दिवसाला सध्या 100 श्रमिक एक्स्प्रेस जातात त्या वाढवण्याची केंद्राची तयारी तयारी असून कामगारांना त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान देशातील वेगवेगळ्या राज्यात कामाच्या शोधात आलेले मजूर लॉकडाउनमुळे अडकले गेले. हाती रोजगार नसल्यामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळी आली. त्यामुळे मजुरांनी स्थलंतराचा मार्ग निवडला. काही कामगार सायकल वर जात आहेत तर काही कामगार जाण्यासाठी काहीच साधन उपलब्ध होत नाही खिशात पैसे नाही म्हणून थेट चालतच जात आहेत. तर काहीजण रस्त्यावरून जात असताना पोलीस रोखत असल्याने रेल्वे रुळांवरून चालत जात आहेत.
राज्य सरकारने देखील मजुरांसाठी मोफत अन्न व निवाऱ्याची सोय केली आहे. तर स्थानिक मजुरांना अन्नधान्य वाटप केले आहे. मात्र काही मजुरांपर्यंत ही मदत पोहोचलेली नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या अशी मागणी लावून धरली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

