मुंबई : ‘कबीर सिंग’ (‘Kabir Singh’) चित्रपटातील अभिनेत्री निकिता दत्ता (Actress Nikita Dutta) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. निकिताचे सोशल मीडियावर लाखो चाहते असून ती सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. मात्र काही दिवसांपूर्वी निकिता वॉकला गेली असताना तिचा मोबाईल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी अखेर तीन जणांना (three arrested) अटक केली आहे.
नुकतेच मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता दत्ता हिचा मोबाईल हिसकावून चोरल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी नुकतेच तीन जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत निकिताने माहिती दिली तसेच याप्रकरणी तिने तक्रारही दाखल केली होती. या घटनेनंतर अवघ्या १५ दिवसात निकिताचा फोन चोरणाऱ्या चोरांना पोलिसांना अटक केली आहे. सध्या पोलीस या सर्वांची चौकशी करत आहे. याच चोरांनी तिचा फोन चोरला आहे की नाही, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान निकिताने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहित माहिती दिली होती. याबाबत ती म्हणाली,’मला तुमच्या सर्वांसोबत एक घटना शेअर करायची आहे. गेल्या काही दिवसांपासून मी कठीण काळातून जात आहे. मी एकाच घटनेविषयी विचार करत आहे. मी वांद्रे येथील रस्त्यावर वॉकसाठी गेले होते. तेव्हा सात वाजले होते. अचानक दोन चोर पाठीमागून आले आणि त्यांनी कपाळावर मारले जेणेकरुन माझे लक्ष विचलित होईल. त्यानंतर त्यांनी माझ्या हातातील फोन खेचून घेतला. मला काही कळण्याआधीच ते तेथून पळून गेले.
या घटनेनंतर पॅनिक अटॅक येऊ लागल्याने आजूबाजूला काही माणसांनी प्यायला पाणी दिले. त्यानंतर ती वांद्रे पोलीस ठाण्यात (Bandra police station) जाऊन तक्रार केली. लोकांना जागरुक करण्यासाठी ही पोस्ट लिहिली असून अशी घटना पुन्हा कुणासोबत घडून नये असे निकिताने या पोस्टद्वारे सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या:
- कामं आम्ही करायची आणि मत मात्र दुसऱ्याला; राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत
- मोठी बातमी! मला कोणीच वसूली करण्याचे आदेश दिले नव्हते; सचिन वाझेचा गौप्यस्फोट
- उर्फी जावेद ‘त्या’ व्हिडिओमुळे पुन्हा झाली ट्रोल
- …म्हणून सारखे पेपर फुटतात; राज ठाकरेंनी सांगितलं पेपरफूटीचं कारण
- महाविकास आघाडी सरकारबद्दल राज ठाकरेंचं मोठं वक्तव्यं

