Share

मोबाइल बिलाची खिशाला कात्री! रिचार्ज ‘इतके’ महागणार?

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी मोबाईल धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कोरोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे कंपन्यांपुढील समस्या अचानक वाढल्या. त्यामुळे पुढील 12 ते 18 महिन्यांमध्ये फोन कॉल आणि इंटरनेटसह सर्व सेवा-सुविधांचा वापर महाग होण्याची शक्यता आहे. या वाढीनंतर रिचार्जचे दर आताच्या तुलनेत दुप्पट होतील. ‘नवभारत टाईम्स’नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

सध्याच्या घडीला मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्या रिचार्जचे दर वाढवण्याच्या विचारात आहेत. याची तातडीनं अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. आता लगेच रिचार्जचे दर न वाढल्यास ते पुढील काही दिवसांत वाढवले जातील, अशी माहिती इमर्जिंग मार्केट्स टेक्नॉलॉजी, मीडिया एँड एंटरटेनमेंट एँड टेलिकम्युनिकेशन्स क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या प्रशांत सिंघल यांनी दिली.

पुढे सिंघल म्हणाले, ‘सध्याची परिस्थिती पाहता ग्राहकांना परवडणारे रिचार्ज देणं गरजेचं आहे. ग्राहकांची आर्थिक स्थिती लक्षात घेता मोबाईल प्लानचे दर वाढवणं फारशी चांगली कल्पना वाटत नाही. पण बाजारात स्थिर राहण्यासाठी कंपन्यांना हे पाऊल उचलावं लागेल, पुढील १२ ते १८ महिन्यांत दोनवेळा मोबाईल प्लान महाग होऊ शकतात. पुढील सहा महिन्यांत कंपन्या पहिली दरवाढ करतील. असंदेखील मात्र अद्याप यावर कंपन्यांकडून कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही.

रम्यान, यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफ दरवाढ केली होती. त्यावेळी कंपन्यांनी टॅरिफचे दर ४० टक्क्यांनी वाढवले. आता दोन टप्प्यांमध्ये कंपन्या दरवाढ करण्याची शक्यता आहे.

#corona_effect : दूरसंचार कंपन्यांचा प्रीपेड ग्राहकांना दिलासा

उष्णतेचा कोरोनावर परिणाम होईल, मात्र तो नष्ट होणार नाही !

महापालिका आयुक्तांच्या रडारवर आता मोबाईल टॉवर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!