🕒 1 min read
पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. पण आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा पुण्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी सर्वच शिलेदारांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.
तसंच पक्षाने हिंदुत्ववादी भूमिका वळण घेतलं असलं तरी निवडणुकीत ‘एकला चलो रे’ अशीच भूमिका असावी, अशी बहुसंख्य मनसैनिकांची भावना असल्याचं पदाधिकाऱ्यांनी राज यांच्या कानावर घातलं, अशी माहिती समोर येत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील राजमहल या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पुणे पालिका निवडणूक १ वर्षावर येऊन ठेपल्याने राज ठाकरे यांनी पालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्राचा दौरा करण्यापूर्वी राज ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत. त्यामुळे आनंदी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्यालाही सोबत येऊ द्यावं, अशी गळ घातली आहे.
पुणे महानगरपालिकेमध्ये मनसेचे केवळ २ नगरसेवक आहेत. २०१२ साली २९ नगरसेवक होते. तेव्हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता. राज ठाकरे एकट्याने लढणार का? भाजपासोबत युती करणार हे गुलदस्त्यात आहे. सध्या तरी कामाला लागा एवढाच संदेश त्यांनी दिला आहे. मनसेचा वर्धापन दिन पुढच्या महिन्यात आहे. त्याच दिवशी राज ठाकरे पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकतील अशी माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रामध्ये सध्या महाविकास आघाडीचे म्हणजेच शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस यांचे सरकार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक हे तिन्ही पक्ष एकत्रित लढवणार कि स्वबळाचा नारा देणार हे पाहणे आगामी काळात उत्सुकतेचे ठरणार आहे. जर का या तिन्ही पक्षांनी युती केली तर भाजप व मनसे एकत्रित येऊन निवडणूक लढवणार का ? हे पाहणे देखील महत्वाचे आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
