टीम महाराष्ट्र देशा : सिंधुदुर्गातील काँग्रेस,राष्ट्रवादी आणि मनसे या पक्षांनी एकत्र येत १६ जुलै रोजी जेलभरो आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. महामार्ग चौपदरीकरण दुरावस्थेबाबत सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष आणि सत्तेतील मंत्र्यानी विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी खुनाचे गुन्हे दाखल करण्याची दिलेली धमकी या विरोधात हे जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. दरम्यान सिंधुदुर्गातील काँग्रेस,राष्ट्रवादी आणि मनसे या पक्षांनी एकत्र येत महामार्ग चौपदरीकरण दुरावस्थेबाबत सत्ताधार्यांचे दुर्लक्ष आणि सत्तेतील मंत्र्यानी विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी खुनाचे गुन्हे दाखल करण्याची दिलेली धमकी या विरोधात येत्या १६ जुलैला जेलभरो आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर हे बोलत होते. त्यावेळी १६ जुलैला छेडण्यात येणारे हे जेलभरो आंदोलन कुणाच्या समर्थनार्थ नाही. तर जिल्ह्यातील जनतेसाठी आहे. त्यामुळे या आंदोलनात जनतेने सहभाग घेऊन सत्ताधार्यां विरोधातील राग व्यक्त करावा असे आवाहन परशुराम उपरकर यानी केले .
इतकेच नव्हे तर गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यातील नागरीक, तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विविध प्रश्नांबाबत आवाज उठवित आहेत. मात्र प्रशासनाकडुन त्याची कुठलीही दाकाहाल घेतली जात नाही. त्यामुळे हे सामुहिक जेलभरो आंदोलन करत असल्याचे त्यांनी म्हंटले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

