टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरा करुन, ठिकठिकाणी सभा घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात प्रचार केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनने भाजपा सरकारच्या फेकुगिरीवर ‘लाव रे तो व्हिडिओ लाव’ हे रॅप बनवले आहे. या रॅपमध्ये भाजपावर टीका करण्यात आली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारसभांमधील काही शॉट्स घेण्यात आले आहेत. या रॅपची निर्मिती गजानन काळे, संदीप देशपांडे यांनी केली आहे.
सोशल मिडीयाचा पुरेपूर वापर करत भाजपा वर टीका करण्यात मनसेने कोणतीच कमी सोडली नाही. ‘लाव रे तो लाव तो व्हिडीओ लाव…लाव रे तो लाव रे तो व्हिडीओ लाव’ असे रॅपचे बोल आहेत.
https://www.youtube.com/watch?v=rTOU_vS1R_c
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

