Share

शेतकऱ्यांसाठी मनसे मैदानात ; १७ मे ला विराट मोर्चा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज ठाकरे यांची मनसे आता मैदानात उतरणार आहे. येत्या १७ मे रोजी ठाण्यात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून किमान ५ हजार शेतकरी या मोर्चात उपस्थित राहणार असल्याचे मनसेचे पालघर आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हंटले आहे. ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात दुष्काळी परिस्थिती सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वचं पक्षांनी दुष्काळी दौरे सुरु केले आहेत. याचदरम्यान राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरणार आहे. आंबा स्टॉल लावल्याने भाजपा नगरसेवकाकडून सचिन मोरे या शेतकऱ्याला २० हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे शेतकऱ्याने देण्यास नकार दिल्याने पालिकेकडून या शेतकऱ्याच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली. आंबा स्टॉलसाठी परवानगी मागितली असताना ती नाकारण्याचं कोणतंही ठोस कारण महापालिकेकडे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी येत्या १७ मे रोजी ठाण्यात शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार असल्याचे मनसेचे पालघर आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हंटले आहे.

इतकेच नव्हे तर, नाशिकहून राहुल ढिकले, पुण्याहून बाबाराजे जाधवराव, मराठवाड्यातून जावेद शेख, कोकणातून वैभव खेडेकर या मनसे नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतकरी मोर्चासाठी शेतकरी ठाण्यात दाखल होतील. तसेच ठाणे जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी, ग्रामपंचायत सदस्य मोर्चात सहभागी होतील. या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनांनीही या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, मनसेकडून या मोर्चासाठी राज्यभरातून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ठाण्यातील विविध मैदानात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेही या शेतकरी मोर्चाला उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनसेच्या या शेतकरी मोर्चाकडे सर्वांचे लक्ष आहे.

शेतकरी मोर्च्यातील मनसेच्या प्रमुख मागण्या

*  सुमारे आठ ते दहा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी १००  स्टॉल उपलब्ध करावेत.

*  सचिन मोरे या शेतकऱ्याकडून पैसे मागणाऱ्या भाजपा नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!