टीम महाराष्ट्र देशा : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या मुंबईत कुठेच पाणी तुंबलं नाही या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. मनसेने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना जाड भिंगाचा चष्मा पाठवत, महापौरांना आता तरी स्पष्ट दिलेस अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मुंबईत गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबईत जागोजागी पाणी तुंबले आहे. इतकेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेरही पाणी तुंबले आहे.
माध्यमांशी बोलताना मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत कुठेच पाणी तुंबलं नाही असा दावा केला. दरम्यान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या या वक्तव्याची मनसेने खिल्ली उडवली आहे.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना जाड भिंगाचा चष्मा पाठवला आहे. इतकेच नव्हे तर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना मुंबईत तुंबलेलं पाणी, लोकांना झालेला त्रास दिसलाच नाही. ते स्वत: म्हणाले शिक्षक आहेत त्यामुळे खोटे बोलत नाही. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांना दिसण्याचा प्रॉब्लेम असावा. म्हणून खास महापौरांसाठी हा जाड भिंगाचा चष्मा आणला आहे.
या चष्म्यातून तरी महापौरांना स्पष्ट दिसावं, अशी आमची अपेक्षा आहे. हा चष्मा आम्ही महापौरांना कुरिअरने पाठवत आहोत. ज्या नेत्यांना मुंबईची दुरावस्था दिसत नाही, त्या सर्वांसाठी मोफत चष्मा पाठवण्याचं काम मनसे करेल असे संदीप देशपांडे यांनी म्हंटले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

