Share

मनसे सरचिटणीस संदीप देशपाडेंना अटक!

Published On: 

मुंबई : लॉकडाउनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा ठप्प आहे. सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसेनं सविनय कायदेभंग आंदोलन पुकारले होते. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांची परवानगी नसताना लोकलने प्रवास करून आंदोलन केले आहे.

मुंबईत कोरोनाबाधितांची आकडेवारी लक्षात घेता मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून चालवली जात आहे. पण, यामुळे चाकरमान्यांना अतोनात हाल सहन करावे लागत आहे. त्यामुळेच मुंबईतील लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी मनसेने केली होती.

मनसेने आक्रमक होत लोकल सुरु करण्यासाठी सविनय कायदेभंग आंदोलन पुकारले होते. त्यानुसार काल मुंबईतील अनेक ठिकाणी मनसे नेत्यांनी लोकलमधून प्रवास करत आहे आंदोलन केले. तर, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी विनातिकीट प्रवास केला होता.

आता रेल्वे पोलिसांनी मनसे सरचिटनिस संदीप देशपांडे यांना अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. देशपांडे यांच्यासह इतर 3 मनसे अधिकाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. रेल्वे आणि कोविड संदर्भात नियम मोडल्यामुळे मनसैनिकांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.

संदीप देशपांडेसह या कार्यकर्त्यांवर आपत्तीकाळात सरकारची कोणतीही परवानगी नसताना प्रवास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51, 52 तसंच महाराष्ट्र कोविड उपाययोजना 2019 च्या कलम 11, त्यासह भारतीय रेल्वे अधिनियम 147, 153, 156 अंतर्गत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!