🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या वेळी कोरोनाच्या बाबतीत सरकारच्या सूचनांबद्दल नापंसती व्यक्त केली होती. तसेच देशात कुठलीना कुठली साथ असतेच असेही म्हटलं होतं आणि कोरोनाची सध्याची स्थिती बघता शासन जास्तच कठोर पावलं घेताय. नागरिकांनी व्यक्तिगत काळजी घ्यावी असही त्यांनी म्हटलं होतं.
आता राज ठाकरेंनाच कोरोनाचा फटका बसला आहे. कारण महाराष्ट्र आणि मुंबईवर कोरोनाचं सावट पाहता मनसेचा यावर्षीचा गुढीपाडवा मेळावा रद्द केला गेला आहे. मनसेने तशी घोषणा केला आहे. मनसेने परिपत्रक काढून येत्या २५ मार्चला होणारा मनसेचा मेळावा रद्द करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
‘कोरोना’चं सावट गडद आहे त्यामुळे ह्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत आहोत.
तसंच येत्या काही आठवड्यात महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत पण एकूण परिस्थिती पाहता सरकारने ह्या निवडणुका किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलाव्यात. pic.twitter.com/DWbkrjLBTQ— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 14, 2020
दरवर्षी गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा होत असतो. परंतू या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मनसेने हे पाऊल उचललेलं आहे. राज्यातले अनेक कार्यक्रम, सभा, मेळावे रद्द करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मनसेने मोठा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, दरवर्षी शिवाजी पार्कवर हजारोंच्या संख्येने राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी मनसैनिक जमत असतात. मात्र यंदाच्या मेळाव्यावर कोरोनाचं सावट असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मनसेने मोठं पाऊल उचललेलं आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

