Share

PM मोदींच्या आर्थिक पॅकेजवर मनसेनेही केला सवाल…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी 20 लाख करोडचं आर्थिक पॅॅकेज जाहीर करत देशात लॉकडाऊन वाढणार असल्याचे घोषित केले. मोदींनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅॅकेजनंतर राज्यातील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर आता मनसेनेही भाजपला लक्ष्य करत सवाल केला आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. लॉकडाऊनमुळं ठप्प झालेली अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी काल २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. महाराष्ट्रासह भाजपच्या देशभरातील नेत्यांनी मोदींच्या या घोषणेचं जोरदार स्वागत केलं आहे. मनसेचे देशपांडे यांनी भाजपला पीएम केअर फंडासाठी भाजप नेत्यांकडून केल्या गेलेल्या आवाहनांची आठवण करून दिली आहे.

करोनाच्या संकटाशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी नव्यानं ‘पीएम केअर फंड’ अर्थात, मदतनिधी सुरू केला आहे. जनतेनं यात योगदान द्यावे, असं आवाहन भाजपकडून सातत्यानं करण्यात येत आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी तर आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना सीएम केअर फंडाऐवजी पीएम केअर फंडात मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यावरून भाजपवर टीकेची झोड उठली होती. मनसेनं आता नेमकं यावरच बोट ठेवलं आहे.

दरम्यान PM मोदींच्या पॅकेजवर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेते रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. गुंतवणूक ओरिएंटेड सबसिडी (गुंतवणूक केंद्रित अनुदान) देण्यापेक्षा रोजगार ओरिएंटेड सबसिडी (रोजगार केंद्रित अनुदान) देण्याची गरज आहे, असे रोहित पवार म्हणाले आहेत.

तर कॉंग्रेसने पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत टीका केली आहे. आता माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काल पंतप्रधानांनी आम्हाला एक मथळा आणि कोरा कागद दिला. साहजिकच माझी प्रतिक्रिया देखील कोरी होती. आज आम्ही अर्थमंत्र्यांकडून भरण्यात येणाऱ्या कोऱ्या कागदावर नजर ठेवून आहोत. सरकार खरंच अर्थव्यवस्थेत सुधारणा करत आहे की नाही हे याकडे आम्ही काळजीपूर्वक लक्ष्य देऊ, असा टोला चिदंबरम यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

आर्थिक पॅकेजनंतर गरजू नागरिकांंच्या खात्यात किमान ७,५०० रुपये रोख रक्कम केंद्राने टाकावी : थोरात

“ते १५ लाख एकत्र करुन हे पॅकेज बनवलं” अनुराग कश्यपचा मोदींना टोमणा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!