राजू थोरात, तासगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील राजकारणात आल्यापासून सातत्याने जनतेतून मेरीटवर निवडून आलेले नेते आहेत. त्यांच्यावर सातत्याने टीका करण्यापेक्षा आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे व प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आमदार पडळकर यांच्याकडून नौटंकी सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी पालकमंत्री नामदार जयंतरावजी पाटील यांच्यावर अनुकंपातुन झालेले नेते अशी बोचरी टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाशकाका पाटील यांनी आमदार पडळकर यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.
‘लोकशाहीत अनुकंपावर नव्हे तर गुणवत्तेवर निवडून येतात हे आमदार पडळकर यांना माहीत नसावे म्हणून ते मागच्या दाराने निवडून आले आहेत. त्यांचा लोकशाहीचा अभ्यास कच्चा आहे. नोकरीत अनुकंपा निकष असतो परंतु लोकशाहीच्या मार्गाने लढवल्या जाणाऱ्या निवडणुकीच्या उमेदवारीत अनुकंपा नसतो एवढे शब्द भाजप आमदारांना समजू नये आश्चर्य वाटते.’ असा घणाघात अविनाश पाटील यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, ‘धनगर समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या बिरोबाची शपथ घ्यायला लावून समाजाची घोर फसवणूक करणाऱ्याकडून काय अपेक्षा करणार हे भाजपच्या नेत्यांना कधी समजणार. आमदार पडळकर यांच्या अशा बेताल वक्तव्याने भाजप अडचणीत यायला वेळ लागणार नाही. लोकांनी स्वीकारल्याशिवाय राजकारण करता येत नाही.’
‘जनतेच्या आशीर्वादावर राजकारणात सत्ता मिळू शकते आणि जयंत पाटील यांनी राजकारणात सुरुवात केल्यापासून आजअखेर जनतेच्या पाठिंब्यावर अनेक पदे मिळवले आहेत. जनतेने लाखोच्या मताधिक्याने निवडून देऊनच ना जयंतरावजी पाटील यांना एका राजकीय उंचीवर आहे. जयंत पाटील यांनी केलेली विकास कामे व हीच जिल्ह्यातील जनतेला माहित आहे यासाठी आमदार पडळकर यांच्या शिफारसीची गरज नाही. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपल्या विचाराच्या आपल्याला मानणाऱ्या किती ग्रामपंचायती आटपाडी तालुक्यात निवडून आणू शकलो हे त्यांनी अगोदर जाहीर करावे.’ अशी बोचरी टीका देखील पाटील यांनी केली.
तर, ‘केवळ राजकीय लोकप्रियता मिळवण्यासाठी मोठ्या नेत्यांच्यावर आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे उद्योग आमदार पडळकर यांच्याकडून सतत केले जात आहेत. जनतेलाही नित्याचेच झाले आहे. ‘अशी सनकून टीका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पवारांसह दिग्गज नेते हजर मात्र शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही !
- राज्यपालांना देण्यासाठी तयार करण्यात आलेलं निवेदन शेतकरी नेत्यांनीच फाडलं !
- रिक्षाचालकांचा विमा काढण्यासाठी माजी खासदार पुत्राने घेतला पुढाकार !
- विदर्भाबद्दल महाविकासआघाडी सरकारच्या मनात राग आहे – देवेंद्र फडणवीस
- ‘वीजेचे कनेक्शन कापण्यासाठी कुणी आले तर त्याला गुलाबाचे फूल द्या आणि गाडीत बसवून परत पाठवा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
