पारनेर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलच तापल आहे. नुकेतच शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीमध्ये बेबनाव झाला आहे. आता पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर नगरपंचायत ही कुठल्याही परिस्थितीमध्ये 17 झिरो केल्याशिवाय सोडणार नाही. कोण उमेदवार आहे, कोण कार्यकर्ता आहे यापेक्षा सर्व 17 प्रभागांमध्ये नीलेश लंके हाच उमेदवार असणार आहे. नगरपंचायतीची निवडणूक काही महिन्यांवर असली, तरी आजच या निवडणुकीच्या प्रचारास प्रारंभ केला आहे. अशी डरकाळी फोडली आहे.
पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यात नगरसेवक नंदकुमार देशमुख, डॉ. मुद्दस्सीर सय्यद, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने या नगरसेवकांचा समावेश आहे. तसेच शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख उमताई बोरुडे, उद्योजक सहदेव तराळ, शैलेश औटी, संतोष गंधाडे, राजेश चेडे आदींनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
अजितदादांनी सेनेच्या ‘त्या’ नगरसेवकांना खूप समजावले पण…
भविष्यात नगरपंचायतीत काही राजकीय गणिते व्हायचे ते होऊ द्या. दुसरी आघाडी, तिसरी आघाडी होऊ द्या किंवा अजून काही. आपण निवडणुकीत 17 शून्य केल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीचा तालुक्यात आमदार आहे. राज्यात सरकार आहे. त्यामुळे सर्व विकासाच्या प्रक्रिया आपल्या माध्यमातून होतील. उद्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मात्र विकासकामे सुरूच राहतील. अस निलेश लंके म्हणाले आहेत.
अंतर्गत भांडणात संजय राऊत यांना सरकार पडण्याची भीती वाटते – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
