Share

आ.अतुल सावे आणि अंबादास दानवेंनी कोरोना रुग्णांसाठी मिळून बनवला आमरस!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनामुळे पॉझिटिव्ह आलेल्यांसाठी औरंगाबाद मनपाने कोविड केअर सेंटर्स सुरु केले आहेत. आज ईद, अक्षय्य तृतीया सण असल्याने रुग्णांना घरच्या जेवणाची आठवण येऊ नये यासाठी अन्नामृत फाऊंडेशनने पुढाकार घेतला. यावेळी रुग्णांनी घरी नसूनही घरच्यासारखा सण साजरा करता आला याचा आनंद व्यक्त केला. अगदी घरच्यासारखा सुमधुर आमरस, मुगवडा भाजी, शेवया मिळाल्याने सणाचा आनंद द्विगुणित झाल्याचे त्यांनी सांगितले. आमरस बनविण्याच्या प्रक्रियेत आ. अंबादास दानवे, आ. अतुल सावे यांचा विशेष सहभाग होता.

आज नियोजनाप्रमाणे एमआयटी कोविड केअर सेंटर, सिपेट कोविड केअर सेंटर येथील रुग्ण डॉक्टर, सपोर्ट स्टाफ, मनपा वाॅर रूम, घाटी, शासकीय कॅन्सर रुग्णालय येथील रुग्णांचे नातेवाईक, लसीकरण जागृती मोहिमेतील मेडिकल विद्यार्थी, मेघालय मुलींचे वसतिगृह येथील विद्यार्थीनी, एन४ येथील कामगार नाक्यावरील कामगार.. आणि इतर ठिकाणचे कोविड रुग्ण तथा त्यांचे नातेवाईक असे मिळून १७०० जणांपर्यंत अक्षय तृतीया व ईद विशेष मेजवानी पोहचवण्यात आली.

लाभार्थ्यांचे आरोग्य अक्षय राहावे या भावनेने, अतिशय स्वच्छ पोषक व पारंपारिक मेजवानी नक्कीच सर्वांना एक सकारात्मक ऊर्जा देऊन जाईल असे अंबादास दानवे यांनी नमूद केले. तर अविरत अन्न सेवेचे एक वर्ष व दहा लाख लाभार्थ्यांपर्यंत जनसेवा पोहचवणे हे अभिनंदनीय आहे असे उद्गार आ. अतुल सावे यांनी काढले. आमरस बनविण्याच्या प्रक्रियेत अन्नामृत फाउंडेशनच्या पूर्णवेळ टीम सोबत तीस स्वयंसेवक व विशेष सहभाग आमदार अंबादास दानवे, आ. अतुल सावे, मनपा उपायुक्त अपर्णा थेटे, जनसंपर्क प्रमुख संजीव सोनार यांचा सहभाग होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!