Share

औरंगाबाद सावरतेय! एका महिन्यात घटले तब्बल ‘एवढे’ रुग्ण!

Published On: 

औरंगाबाद : एप्रिल महिन्यात शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने कोविड केअर सेंटर व रुग्णालयातील सर्वच बेड्स फुल्ल झाले होते. मात्र मे महिन्यात रुग्णसंख्या घटत आहे. सध्यस्थितीत शहरात केवळ १,३४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच होम आयसोलेशनमधील संख्याही ५२३ आहे. परिणामी सरकारी रुग्णालयांसह आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.

औरंगाबाद शहरात फेब्रुवारी महिन्यात तिसर्‍या आठवड्यापासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने डोके वर काढले. मार्च आणि एप्रिल महिन्यात वाढत्या रुग्णसंख्येने आजवरचे सर्व रेकॉर्ड तोडत उच्चांक गाठला होता. मार्च महिन्यात शहरासह जिल्ह्यात तब्बल ३२ हजार ३१३ बाधित निघाले. तर एप्रिल महिन्यात सुमारे ४१ हजार नवीन कोरोनाबाधित आढळले. यामुळे एप्रिल महिन्यात शहरातील बाधितांची सक्रिय रुग्णांची संख्या ही १० हजारांवर पोहचली होती. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात बेड्स उपलब्ध नसल्याने शासन निर्देशांनुसार सौम्य लक्षणे असलेल्या सुमारे चार हजार रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत होते.

दरम्यानच्या काळात पालिका व जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना राबवल्या. परिणामी, मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यासह शहरात रोज नव्याने आढळणार्‍या रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. १ मे वगळता जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येचा आकडा हजारापेक्षा कमी होऊन ६०० ते ७०० पर्यंत खाली आला आहे. आजघडीला शहरात केवळ १३४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळे पालिकेचे कोविड सेंटर्स, मेल्ट्रॉन, घाटी व जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी झाली असून आरोग्य यंत्रणेचा ताण कमी होऊन दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!