औरंगाबाद : शिवसेना ही हिंदूत्त्वादी असली तरी शिवसेनेचे हिंदुत्त्व हे कोणत्याही धर्माशी जोडलेले नाही. तर शिवसेनेचे हिंदुत्त्व हे भारत मातेशी जोडलेले असल्याचे मत शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या हिंदुत्त्वाच्या मुद्यावर भाजपच्या वतीने वारंवार टीका होत असताना आमदार दानवे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानादरम्यान शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहे. यामध्ये विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला जात आहे. त्याच अंतर्गत विविध पक्षातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या निमित्त दानवे यांनी भाजप आणि इतर विरोधी पक्षांना प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्त्वाचा मुद्दा बाजूला ठेवला असल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपच्या नेत्यांच्या वतीनेही वारंवार शिवसेनेवर हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन टीका होत आहे. मात्र, आमचे हिंदुत्त्व हे भारत मातेशी जोडलेले असल्याचे सांगत दानवे यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पटोलेंच्या ‘त्या’ वक्तव्याने काँग्रेसमध्ये ‘कहीं खुशी कहीं गम’
- ‘सध्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाही’, काँग्रेसचे स्पष्टीकरण
- मोठी बातमी! ‘महाराष्ट्रात काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढणार!’, राहुल गांधींना भेटल्यानंतर पटोलेंची घोषणा
- ‘महाराष्ट्राचे नविन मॉडेल! उद्योगधंद्यांना बंदी, डान्स बारची चांदी!’
- ‘आता देशाची राजधानी गुजरातला गेली तरी आश्चर्य वाटणार नाही’, काँग्रेसचा भाजपला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
