Share

कोरोनाबाबत समुपदेशन करण्यासाठी गेलेल्या नर्स सोबत जे घडले त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली

Published On: 

सोलापूर : एकत्र खेळू नका कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशी सूचना करून समुपदेशन करणाऱ्या परिचारिकेची व तिच्या पतीची दुचाकी जाळण्याचा प्रकार कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोदूताई परुळेकर विडी कामगार वसाहत येथे घडली.

मार्कंडेय सहकारी रुग्णालयातील परिचारिका सुरेखा श्रीशैल पुजारी (वय 30) या गुरुवारी पती श्रीशैल पुजारी (वय 32, रा.817/4, गोदूताई विडी कामगार वसाहत) यांच्याबरोबर रुग्णालयाला कर्तव्यावर जात होत्या. गोदूताई घरकुलच्या मोकळ्या मैदानावर काही मुले  खेळत होते. त्यांना पुजारी दाम्पत्याने, कोरोनाचा संसर्ग वाढत आहे,  आता तरी तुम्ही असे मैदानात एकत्र खेळू नका, अशी सूचना केली.

त्यावर काही तरुणांनी, तू रोज मार्कंडेय हॉस्पिटलला जातेस तुझ्यामुळे कोरोना येत नाही का, असं म्हणत, दमदाटी केली. यामुळे पुजारी दाम्पत्याने कुंभारी पोलिस चौकीमध्ये तक्रार केली, मात्र कोणीही पोलीस आले नाहीत.

दरम्यान, शुक्रवारी पहाटे 2 वाजता अज्ञात समाजकंटकांनी शुक्रवारी पहाटे 2 वाजता सुरेखा पुजारी यांची दुचाकी (एमएच 13- 6155) आणि त्यांच्या पतीची दुचाकी (एमएच 13 सी 4213) या दोन्ही गाड्या पेट्रोल टाकून जाळल्या.

याबाबत फिर्याद देण्यास पुजारी दाम्पत्य वळसंग पोलीस ठाण्यात गेले असता, अधिकारी शुक्रवारी सकाळी हजर नसल्याने सकाळी गुन्हा दाखल होण्यास सुरवातही झाली नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!