🕒 1 min read
लखनऊ : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अखेर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अटक केली आहे. पोलिसांनी आशिष मिश्राला शनिवारी सकाळी ताब्यात घेतले होते. त्याची जवळपास 12 तास चौकशी केली. या चौकशीनंतर त्याला अटक केली आहे.
आशिषची पोलिसांनी उशिरापर्यंत चौकशी केली. त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. ३ ऑक्टोबरला घटनेच्या दिवशी दुपारी २.३६ ते ३.३० दरम्यान तो कुठे होता, या प्रश्नाचे उत्तर आशिष देऊ शकला नाही. याच वेळेत वाहनाने चिरडल्याने चार शेतकरी ठार झाले होते. त्यानंतर भाजपचे दोन कार्यकर्ते आणि पत्रकारासहित आणखी ४ जण मारले गेले होते. दरम्यान, आशिष याला आता न्यायालयात हजर केले जाईल. पोलिस न्यायालयात आशिष याला कोठडी देण्याची मागणी करतील.
Ashish Mishra, son of MoS Home Ajay Mishra Teni, has been arrested as he was not cooperating during the interrogation and didn't answer few questions. He will be produced before the court: DIG Upendra Agarwal, Saharanpur pic.twitter.com/nLG3HcmNME
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 9, 2021
सहारनपूरचे डीआयजी उपेंद्र यादव यांनी याविषयी सांगितले. ‘अनेक तासांपासून सुरु असलेल्या चौकशीत आशिष मिश्राने सहकार्य केलं नाही. तो अनेक गोष्टी सांगू इच्छित नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला आता कोर्टात हजर केलं जाईल’. पोलिसांनी आशिष मिश्राला खून, गुन्हेगारी कट, बेपर्वा ड्रायव्हिंगची कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांना राजीव सारस्वत सन्मान प्रदान
- ‘नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचे भान सोडून एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची वकिली सुरू केल्याचे दिसते’
- अन्नदात्यासाठी जनतेने ‘महाराष्ट्र बंद’ला स्वतःहून पाठिंबा द्यावा – नवाब मलिक
- वेळ आली तर कर्ज काढू, पण शेतकऱ्यांना मदत करू; अजित पवार यांची ग्वाही
- नुकसान भरपाईसाठी शेतकरी संघर्ष समिती आक्रमक, रास्ता रोको करत दिला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

