Share

मीनाक्षी थापा हत्याप्रकरण; आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्याकडे काम करीत असलेले ज्युनिअर आर्टिस्ट अमित जयस्वाल व त्याची गर्लफ्रेंड प्रीती सरिन यांना बुधवारी सत्र न्यायालयाने मीनाक्षी थापाची हत्या, अपहरण व तिच्या कुटुंबीयांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी दोषी ठरवले. दोन्ही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मीनाक्षी थापा ही नेपाळी अभिनेत्री होती. तिने हिंदी सिनेमांत छोटे-मोठे काम केले आहे. तिला आणखी काही सिनेमांत काम देतो, असे सांगून अमित व प्रीतीने तिची फसवणूक केली. तिला मुंबईहून गोरखपूरला आणल्यावर मीनाक्षीच्या कुटुंबाकडून १५ लाखांची खंडणी मागितली. मात्र, तिचे कुटुंबीय केवळ ६० हजार रुपये देऊ शकले.

मीनाक्षीने या दोघांना आपण फार श्रीमंत असून केवळ आवडीसाठी चित्रपट करीत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तिचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा कट त्यांनी रचला. परंतु, १५ लाखांऐवजी ६० हजार मिळत असल्याने त्यांनी तिची हत्या केली. ओळख पटू नये यासाठी धड, डोके वेगळे करून त्याची विल्हेवाट वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!