Share

मिलिंद एकबोटेंना दुसऱ्या गुन्ह्यातही जामीन , तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट देशा- कोरेगाव भीमा येथे झालेल्या जाळपोळ आणि तोडफोड प्रकरणात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांच्या न्यायालयाने विविध अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यानंतर त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मंगळवारी (दि.17) सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर गुरूवारी (19 एप्रिल) जामीनावर निर्णय राखून ठेवण्यात आला होता.

एकबोटे यांना अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात यापूर्वीच जामीन मंजूर झाला असून दुसऱ्या प्रकरणातही जामीन मिळाल्याने त्यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी दोन गटात झालेल्या वादातून हिंसाचार झाला होता. हिंसाचारात वाहनांची तोडफोड तसेच वाहने पेटवून देण्यात आली होती. दंगल घडवणे, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मिलिंद एकबोटे आणि श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!